लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटल्याने उद्योग अडचणीत
लोटे सीईटीपीतून करंबवणे खाडीत जाणारी सांडपाणी पाईपलाईन कोतवली येथे फुटल्याने गेल्या ३ दिवसांपासून औद्योगिक वसाहतीतील उद्योग अडचणीत सापडले आहेत. गेल्या ३ दिवसांपासून सीईटीपीने सांडपाणी घेणे बंद केल्याने उद्योगांच्या सांडपाणी साठवण टाक्या फुल्ल झााल्या आहेत. सध्या या पाईपलाईनची दुरूस्ती एमआयडीसीकडून युद्धपातळीवर सुरू असली तरी जीर्ण झालेली ही पाईपलाईन सातत्याने नादुरूस्त होत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत.खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये घेवून त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेनंतर ते सांडपाणी ६३० मि.मी. व्यासाच्या एच.डी.पी.ई. पाईपलाईनमधून लोटे ते करंबवणे खाडीत सोडले जाते. त्यासाठी सुमारे साडेसात कि.मी. ची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गेल्या रविवारी सायंकाळी कोतवली येथे या पाईपलाईनच्या पॅच क्लॅम्बमधून गळती सुरू झाली. यामुळे खाडीत मोठ्या प्रमाणात लालसर रंगाचे सांडपाणी गेले. पाईपलाईन नादुरूस्त झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून एमआयडीसीने दुरूस्तीचे काम हाती घेतले. मात्र गेल्या ३ दिवसानंतरही तीची दुरूस्ती पूर्णत्वास गेेलेली नाही. www.konkantoday.com