
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात महिला मतदारांचे प्रमाण अधिक
लोकसभा निवडणुकीचे वातावरण एका बाजूला तापत असतानाच मतदारसंघाची वैशिष्ट्ये, नव्या बाबी, संख्याशास्त्रीय माहितीही उपलब्ध होत आहे. पूर्वीपासून आपले वेगळेपण जपत आलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाने यावेळीही आपले वैशिष्ट्य जपले आहे. दिव्यांग संचलित राज्यातील सर्वाधिक मतदान केंद्रे याच मतदारसंघात स्थापन होणार आहेत.याचबरोबर राज्यातील केवळ ३ मतदार संघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा जास्त आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघामध्येही या मतदार संघाचा समावेश होतो. म्हणूनच रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या नारी राज्यात भारी असे म्हटले जात आहे. www.konkantoday.com