
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी काही व्यापारी हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारत असल्याचा संशय
हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला असून मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी काही व्यापारी आंब्याची विक्री करत आहेत. मात्र, हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात असल्याचा संशय ग्राहक व्यक्त करत आहेत.सध्या मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे स्टॉल्स लावून हापूस आंब्याची विक्री होत आहे. परंतु, लहान फळ आणि किंमतही कमी असा असा हापूस आंबा नक्की देवगड हापूस का ? असा प्रश्न पडत आहे. कारण विक्रेते कणकवली येथील स्थानिक असल्याचा सांगत आहेत. मात्र, त्यांची बोलीभाषा मराठी आणि कन्नड मिश्रित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.देवगड हापूसचा हंगाम सुरू झाला असून सध्याचा दर ८०० ते १२०० रुपये डझन असा आहे. मुख्य म्हणजे कर्नाटकी हापूस आणि चवीत मोठा फरक असतो. सामान्य ग्राहकाला मात्र याचा अंदाज येत नाही. त्यामुळे महामार्गावरून पुणे, मुंबई किंवा अन्य भागात जाणाऱ्या पर्यटकांना या देवगड हापूस आंब्याची ओळख पटलेली आहे. त्यामुळे सहाजिकच स्थानिक देवगड किंवा रत्नागिरी हापूस व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com