नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सावंतवाडीमध्ये

भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.म्हणाले, ”निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राणेंचा विजय निश्चित आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात असून कणखर नेतृत्व म्हणून मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत.आम्ही जनतेसमोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. ती पुढील काळात तीन नंबरवर आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button