ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग – रत्नागिरी या जागा भाजपकडे जाणार?
महायुतीच्या वादात सापडलेल्या जागांचा फैसला अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग – रत्नागिरी या जागा भाजपकडे जातील.शिंदेसेनेला नाशिक, कल्याण, पालघर आणि औरंगाबाद या चार जागा दिल्या जातील. आतापर्यंत बारामती, शिरूर, उस्मानाबाद आणि रायगड अशा चार जागा मिळालेल्या आणि आपल्या कोट्यातील एक जागा महादेव जानकर यांना देणाऱ्या अजित पवार गटाने नाशिकच्या जागेचा आग्रह धरला आहे, पण या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही असून तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या जागेची मागणी भाजपनेही सोडलेली नाही. जागांच्या अदलाबदलीत नाशिक वाट्याला आले तर घेण्याची तयारी भाजप नेत्यांनी ठेवली आहे.
मुंबईत शिंदेसेनेला आतापर्यंत एकच (दक्षिण मध्य -राहुल शेवाळे) जागा मिळाली आहे. गजानन कीर्तिकर सध्या खासदार आहेत त्या मुंबई उत्तर-पश्चिमची किंवा मुंबई दक्षिणची जागा द्या अशी शिंदेसेनेची मागणी आहे. या दोनपैकी एक जागा शिंदेसेनेला देऊन उरलेली एक जागा आणि मुंबई उत्तर-मध्य अशा दोन जागा भाजपकडे जातील. मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला असल्याने त्यांना जागा देण्याचा विषय आता संपला आहे.
www.konkantoday.com