जिल्ह्यात यंदा १२,३४५ विद्यार्थ्यांना मिळणार आरटीई प्रवेश
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्यानुसार जिल्ह्यात २ हजार ४३१ शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. जिल्ह्यात १२ हजार ३४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यावर्षी इंग्रजी माध्यम शाळांव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. नतवर्षी २०२३-२४ मध्ये ९३६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध होत्या.www.konkantoday.com