
गुहागर तालुक्यातील अंजनवेलमध्ये पाच दिवसाआड पाणीपुरवठा
गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे पाणी पाच दिवसाआड प्रत्येक वाडीला सोडण्यात येत असल्याने येथील आरजीपीपीएल कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीची सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. विशाल समुद्रकिनारा व रत्नागिरी गॅस प्रकल्प (आरजीपीपीएल) यामुळे अंजनवेल गाव अधिक सुपरिचित मात्र या गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. ग्रामपंचाचयतीच्या पाणी योजनेचे पाणी प्रत्येक वाडीला पाच दिवसाआड सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.www.konkantoday.com