
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम,सध्या फिजिओथेरपी सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाइन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर सध्या फिजिओथेरपी सुरू असून त्यांना योग्य वेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या त्रासामुळे १० नोव्हेंबर रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्या प्रकृतीविषयीची माहिती राज्यातील जनतेला दिली होती. जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्याने लवकर तब्येत बरी होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर १२नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर यशस्वी स्पाइन सर्जरी करण्यात आली. एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांच्या निरीक्षणाखाली ते उपचार घेत आहेत.
www.konkantoday.com