
कोकण मार्गावर आणखी २ उन्हाळी स्पेशल
कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल्ल धावतात. गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी २ उन्हाळी स्पेशल कोकण मार्गावर धावत असतानाच त्यात आणखी दोन उन्हाळी स्पेशलची भर पडली आले. दोन एलटीटी-थिविम उन्हाळी स्पेशलच्या ३२ फेर्या प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी जाहीर केले. यामुळे चाकरमान्यांसह पर्यटक पुन्हा सुखावले आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली उधना-मंगळूर स्पेशल ६ एप्रिलपासून कोकण मार्गावर धावत आहे. www.konkantoday.com