
अमित शहांकडून दादा इदातेंना पुस्तक भेट
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रभू श्रीराम यांचे विविध देशात असणार्या टपाल तिकिटांचे संकलन असणारे पुस्तक नुकतेच दापोलीतील पद्मश्री भि. रा. इदाते यांना भेट दिले.या पुस्तकासोबत त्यांनी एक पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या पत्रासोबत मी तुम्हाला एक खास पुस्तक पाठवत आहे. आधुनिक युगात भगवान राम यांचे महत्व पटवून देण्यासाठी प्रभू श्रीरामांवर छापलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर ठरेल. प्रभू श्रीरामांच्या व्यक्तीरेखेने संपूर्ण जगावर प्रभाव टाकल्याची माहिती या पुस्तकाद्वारे होईल. सुख-दुखात संयम, उत्साह, करूणा, शौर्य, अलिप्तता, कुटुंब, वातावरण, नातेसंबंध, रणनीती समर्पण आणि त्याग यात राम हाच प्रेरणास्थान आहे. तो आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये आणि सर्वव्यापी आहे. उदाहरण म्हणून पुस्तक तुमच्या समोर आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.www.konkantoday.com