लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १६ मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आतापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून बंधपत्र करून घेतली आहेत, तर १५९ जणांना वॉरंट बजावण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पोलिस दल पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत ३९१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.www.konkantoday.com