
लोकसभा निवडणूक प्रशिक्षणात काम करणार्या कर्मचार्यांना योग्य तो सन्मान करण्याच्या सूचना
लोकसभा निवडणूक प्रशिक्षणातकाम करणार्या कर्मचार्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. वेळ पाहून जेवण, नाष्ट्याची व्यवस्था व्हायला हवी, पुन्हा असा प्रकार नको, अशी तंबी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी लोकसभा निवडणूक प्रशिक्षणातील जेवणावरून उडालेल्या गोंधळावरून संबंधित अधिकार्यांना दिल्याचे वृत्त आहे. तसेच यापुढे योग्य काळजी घेण्यााच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यातूनच रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी खेड, चिपळूण व गुहागरमधील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.या सर्वांसाठी ४ दिवसांपूर्वी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र व युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहहात मतदान कार्यपद्धत आणि मतदान यंत्र प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून शेकडो कर्मचारी प्रशिक्षणाला उपस्थित होते. असे असताना त्यांना नाष्टा, पाणी व दुपारचे जेवण न देता चक्क दोन कचोरी, एक लहान वडा देण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नाराजी निर्माण झाली होती व त्यांनी वरिष्ठापर्यंत तक्रारी केल्या होत्याwww.konkantoday.com