
लासलगाव प्रक्रिया केंद्रातून पहिल्याच खेपेत ७ हजार ५०० पेट्यांमधून २८ टन हापूस आंब्यांची अमेरिकेत निर्यात
लासलगाव येथील विकिरण प्रक्रिया केंद्रातून पहिल्याच खेपेत ७ हजार ५०० पेट्यांमधून २८ टन हापूस आंब्यांची अमेरिकेत निर्यात झाली आहे.यामध्ये ३० टक्के हापूस रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील असल्याची माहिती येथील पणन विभागाच्या अधिकार्यांनी दिली. गेल्याच आठवड्यात हापसूची वारी अमेरिकेला रवाना झाली असून गतवर्षापेक्षा ही निर्यात तुलनेने कमी असल्याचे सांगितले जात आहे.लासलगाव येथील कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून कृषक केंद्राची स्थापना करण्यात आली. मात्र, गेल्या १६ वर्षांपासून या केंद्रावर आंब्यावर विकीरण प्रक्रिया करून निर्यात केली जात आहे. विशिष्ट गोडी, चव, आकार व आकर्षकपणा यामुभारतीय विविध वाणांच्या आंब्यांना परदेशात असलेली मागणी लक्षात घेऊन अमेरिकेच्या निर्यात मानकांप्रमाणे आंब्यावर विकीरण प्रक्रिया होते.www.konkantoday.com