
राजापूर तालुक्यातील नेरकेवाडी येथील ७० फुट खोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यु
_राजापूर तालुक्यातील नेरकेवाडी येथील ७० फुट खोल विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सदर मृत बिबट्याला आज गुरुवारी सकाळी वनविभागाने विहिरीबाहेर काढले आहे. याबाबत राजापूर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मौजे- नेरकेवाडी, ता. राजापूर, येथील वनिता तानाजी मांडवकर यांच्या राहत्या घराच्या परिसरातील असलेल्या विहिरीमध्ये वन्य प्राणी खवल्या मांजर पडून मृत अवस्थेत पडला असल्याची वनिता मांडवकर यांनी वनपाल राजापूर यांना फोन वरून माहीती दिली. त्यानंतर सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवण्यात आली . सदरच्या विहरीची खोली 60 ते 70 फूट व रात्रीचा अंधार असल्यामुळे विहिरीत काही दिसत नसल्याने तसेच आवाज व कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व रेस्क्यु टिमने दुसऱ्या दिवशी सदर वन्यप्राण्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आज गुरुवारी सकाळी ८ वा. वनपाल राजापूर यांनी वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यावेळी विहीर सुमारे ६० ते ७० फुट खोल व १० फुट रुंद असून विहिरीवर ३ फुटाचा चौकोनी कठडा असल्याचे लक्षात आले व सदर विहिर कठड्यावर शेडनेटने झाकलेले असून ते मध्यभागी फाटलेले असुन सदरची विहीर पूर्णपणे कातळ भाग असलेल्या ठिकाणी खोदलेली आहे. सदर विहीरीमध्ये सहा ते सात फुट पाणी असून त्यावर बिबट्या मृत अवस्थेत तरंगताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आला. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीमध्ये प्लास्टिकची टोपली सोडून त्याच्या सहाय्याने बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात आले. सदरचा बिबट्या अंदाचे १ वर्षाचा असुन तो मादी जातीचा आहे. www.konkantoday.com