
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील दोन शोरूम वर चोरट्यांचा डल्ला
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील टाटा व जागृत मोटर्सचे शोरूम चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी शोरूममधील लॅपटॉप, मोबाईलसह ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शोरूमचे कर्मचारी अरूण अशोक देशपांडे यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरजोळे एमआयडीसी येथे टाटा मोटर्स व त्याहून अधिक काही अंतरावर जागृत मोटर्सचे शोरूम आहे. ८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी टाटा मोटर्सच्या काचेच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच केबिनच्या ड्रॉव्हरमधील रोख रक्कम चोरून नेली. यानंतर काही अंतरावर असलेल्या जागृत मोटर्सच्या शोरूमकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला. www.konkantoday.com