
पेट्रोल पंपावरून येणार्या टँकरद्वारे मिकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे डिझेल विक्री ?
पेट्रोल पंपावरून येणार्या टँकरद्वारे मिकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे डिझेल विक्री होत असल्याचा आरोप येथील राजीवडा महिला मच्छिमार सहकारी संस्थेने करत आक्रमक भूमिका घेतली आहे. बाहेरील पेट्रोलपंपावरील टँकरने मच्छिमार नौकांना डिझेल विक्री केली जात असल्याने त्यावर कारवाईची मागणी केली. या मागणीची दखल घेत येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयानेही त्याबाबत खातरजमा करून योग्य कारवाईसंदर्भात पावले उचलली आहेत.मच्छिमार सहकारी संस्थांच्याा नौका तपासणी होवून प्रमाणित होत नाहीत, तोपर्यंत सहकारी संस्थांनी डिझेल वितरित करू नये, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने कळविले आहे. असे असताना येथील मिरकरवाडा बंदरावर गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलपंपावरील टँकरने मच्छिमार नौकांना डिझेल विक्री केली जात आहे. या संदर्भात राजीवडा महिला मच्छिमार सहकारी संस्थेने अनेकवेळा मिरकरवाडा प्राधिकरणासह सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला चित्रिकरणाच्या पुराव्यासह तक्रार अर्ज दिले. परंतु बंदरावरील टँकरने होणारी डिझेल विक्री थांबलेली नसल्याचे म्हणणे आहे www.konkantoday.com