तरुणीच्या प्रेमसंबधामुळे तिच्या भावाला अश्लील शिवीगाळ, मारहाण, चार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
तरुणीच्या प्रेमसंबधामुळे तिच्या भावाला अश्लील शिवीगाळ, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चार संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित बासिद मेहताब साखरकर (वय २५, रा. अकबर मोहल्ला- साखरतर, रत्नागिरी), मेहताब साखरकर, व दोन अनोळखी (नाव पत्ता माहित नाही असे संशयित आहेत. ही घटना सोमवारी (ता. ८) दुपारी दीडच्या सुमारास शहरातील टिळक आळी येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बहिणीचे दीड वर्षापासून संशयित बासिद साखरक यांच्याबरोबर प्रेमसंबंध होते. काही दिवसापुर्वी फिर्यादी यांची बहिण घरातून कोठेतरी निघुन गेली. दोन ते तीन दिवसानंतर ती परत आली होती. त्यानंतर कुटुंबाने पोलिस ठाण्यात नेले असता पोलिसांनी संशयिताला समज दिली होती. त्यानंतर फिर्यादी यांच्या बहिणीने सहा महिन्यापुर्वी चिपळूण येथे नर्सिंग कॉलेजला प्रवेश घेतला होता. ती गल्स हॉस्टेलला रहात होते. मात्र संशयित तेथेही भेटायला जात होता. एक दिवशी तेथे तिला चक्कर आल्याने तो तिला उचलून त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला व तेथे त्याने टिना माझी बायको आहे. तुम्ही कोणही तिला हात लावयचा नाही असे सांगितले होते. सोमवारी फिर्यादी यांची बहिण टिळक आळी येथे संशयिताबरोबर दिसल्यावर विचारणा केली असता अश्लिल संभाषण करुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर संशयितांनी हाताच्या थापटाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. www.konkantoday.com