जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत, त्या संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार
जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत, त्या संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने हायकोर्टात तसं स्पष्ट केलं आहे. गुरूवारपासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंग कँपवर न येणाऱ्यानी कारवाईसाठी तयार राहावं असं आयोगानं ठणकावलं आहे. विनाअनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. पण तसाच दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.शिक्षकांचं मुख्य काम सोडून त्यांना निवडणुकीच्या कामात जुंपलं जात असल्याची तक्रार करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने न्यायालयात आपलं मत मांडल. या आधी राज ठाकरेंनी शिक्षकांच्या या कामाला विरोध केला होता.www.konkantoday.com