जी जी पी एस गुरुकुलची देवांशी चौगुले देणार ‘इस्रो’ ला भेट ’इस्कॉन’च्या भगवतगीतेवर आधारित स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर झाली निवड
रत्नागिरी | प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून पुस्तक वाचून अभ्यास करावा तसेच गीतेचा सार जाणून घ्यावं आणि तसे आपले आचरण असावे या उद्देशाने इस्कॉन या संस्थेकडून भगवदगीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्प, रत्नागिरी (जी जी पी एस) या शाळेच्या कु. देवांशी आशिष चौगुले या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर 50 विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे.ही स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला स्तरावर लिखित स्वरूपात दुसऱ्या स्तरावर टेलिफोन इंटरव्यू आणि तिसऱ्या स्तरावर झूम इंटरव्यू हे तिन्ही स्तर पार करत देवांशी आशिष चौगुले या गुरुकुल इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला जिल्हास्तरावर निवडलेल्या सहा विद्यार्थ्यांमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून तिची राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे.राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले 50 विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इसरो, बेंगलोर येथे भेट देणार असून त्यांना 23 एप्रिल रोजी इस्रोच्या सभागृहात बंगलोर येथे इसरो चे श्री. श्रीधरा सोमनाथ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. देवांशी चौगुले हिच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांच्यासह जी जी पी एस च्या मुख्याध्यापिका सौं. सोनाली पाटणकर, गुरुकुल प्रमुख नितीन लिमये तसच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.