हा राजकारणातील मुन्नाभाई! उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाने मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यानंतर आता महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं.हल्ली शाल घेऊन फिरतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाने मनसे आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.हा राजकारणातील मुन्नाभाई!उद्धव ठाकरे या भाषणामध्ये म्हणाले, ”मला शिवसैनिकाने विचारलं, तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? त्याच्यात नाही का गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. तशी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात कधी, मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटातला मुन्नाभाई किमान लोकांची मदत तरी करत होता. त्यातलं एक लक्षात घ्या, शेवटी त्या मुन्नाभाईला कळत ही, आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत, तर फिरू द्या.”www.konkantoday.com