सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे जीआय मानांकन
*जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन दिले आहे.त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे. लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.www.konkantoday.com