
वडवली येथील नळपाणी योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुमारे २२ दिवस बंद ,पाणीपट्टी माफ करण्याची मागणी
दापोली तालुक्यातील वडवली येथील नळपाणी योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुमारे २२ दिवस बंद होता.येथील ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे सखाराम महाडिक यांनी १ वर्षाची पाणीपट्टी माफ करावी, असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. यावर गटविकास अधिकारी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.www.konkantoday.vom