लोकांच्या जीवाशी खेळ करता; रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला
_सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक रामदेव बाबा आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांना दणका दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. पण न्यायालयाने त्याचा माफीनामा फेटाळला आहे. ‘या प्रकरणात आम्ही उदारता दाखवणार नाही. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने दाखल केलेले उत्तरही समाधानकारक नाही. माफी कागदावर मागितली आहे. यामुळे आम्ही ती फेटाळून लावतोय. जाणूनबुजून उल्लंघन केले आहे. यामुळे परिणामांसाठी तयार राहा’, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए अमानुल्लाह यांच्या पीठाने फटकारले आहे. ‘आम्ही आंधळे नाही. सगळं दिसतंय’, असेही न्यायालयाने सुनावले. या प्रकरणी आता 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.www.konkantoday.com