लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर उन्हाळ्याचा परिणाम होणार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. प्रचार करताना, तसेच कामानिमित्त उन्हात फिरताना उष्णतेपासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.प्रत्यक्ष मतदानासाठी काही दिवस शिल्लक असल्याने नेते मंडळींसाठी दिवसातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. मात्र उन्हाच्या झळा वाढल्याने प्रचारातही अडथळे निर्माण होत आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवे, काय करू नये, याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. काही दिवसांपासून उष्णतेचा पार ३५ अंशापासून ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते. १२ वाजता कडक ऊन पडते. दुपारी चारनंतर उन्हाच्या झळा कमी होतात. या दरम्यान रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट असतो. अशीच स्थिती राजकीय प्रचार सभांमध्ये होत असल्याने आग्रह करूनही पक्षाचे कार्यकर्ते सभेस हजर राहण्याचे टाळत आहेतwww.konkantoday.com