रत्नागिरी येथील शिरगाव भात संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ या भात बियाण्याचा कोकणातील शेतकऱ्यांकडून पहिली पसंती
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या शिरगाव (ता.रत्नागिरी) भात संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ या भात बियाण्याचा कोकणातील शेतकऱ्यांकडून पहिली पसंती मिळत आहे. हे लक्षात घेऊन विद्यापिठाने १५० टन भात बियाणे शेतकर्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.रत्नागिरी-८ ही जात २०१९ साली अधिघोषित झाली आहे. १३५-१४० दिवसात तयार होणारी जात असून त्याचा दाणा मध्यम बारीक आहे. चवीला उत्तम असून कापणी वेळेवर केली तर अखंड तांदूळ जास्त होतो. तांदूळ तुटीचे प्रमाणही खुपच कमी आहे. मध्यम उंचीची असल्यामुळे लोळत नाही. करपा किंवा कडा करपा रोगास प्रतिकारक असून वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडीला कमी बळी पडते. आजकालच्या बदलत्या हवामानामुळे योग्य असणारी हि जात आहे. उशीरा पडणाऱ्या (गणपती उत्सवाच्या दरम्यान) पावसाचा फटका बसत नाही. गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा अनुभव खुपच चांगला आहेwww.konkantoday.com