मतदारांवर निसर्ग, तोक्के वादळ, महापूर व कोरोना संकट आले तेव्हा अनंत गीते काय करत होते ?आदीती तटकरे यांची टीका
अनेकवेळा खासदारकीची संधी मिळूनही केवळ निवडणुका लागल्यावर मतदारसंघाचा पंचवार्षिक दौरा करणाऱ्या माजी खासदार अनंत गीते यांना विकासाच्या बाबतीत बोलण्यासाठी कोणताच मुद्दाच शिल्लक राहिलेला नाही. अवजड उद्योग मंत्री असताना त्यांनी मतदार संघात किती उद्योग आणले, मतदारांवर निसर्ग, तोक्के वादळ, महापूर व कोरोना संकट आले तेव्हा ते काय करत होते याचा हिशोब द्यावा, मतदारांना हात वर करुन मुठी आवळून शपथ देण्याचे दिवस आता गेले अशी टीका आदीती तटकरे यांनी भिंगळोली येथे केली.महाविजय २०२४ अंर्तगत भाजप तालुका शाखा मंडणगड यांचा बुथ वॉरीयर्स व कार्यकर्ता मेळावा ८ एप्रिलला भिंगळोली येथील यादव चँरीटी ट्रस्टचे श्रीकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तटकरे म्हणाल्या की विकसित भारत संकल्पपुर्ती व पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडुन आणण्यासाठी महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी एकदिलाने निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे आहे. सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादीचे खासदार नसुन ते महायुतीचे खासदार म्हणून निवडून येणार आहेत. त्यामुळे आपली मते व भावनांचे निश्चीतच स्वागत आहे.www.konkantoday.com