गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमधून ४२ लाख ६३ हजार रुपयांची दारू पकडण्यात गोवा अबकारी विभागाला यश

गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमधून ४२ लाख ६३ हजार रुपयांची दारू पकडण्यात गोवा अबकारी विभागाला यश आले आहे. महाराष्ट्र – गोवा सीमेवर पत्रादेवी चेकनाक्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.बायोमेट्रिक कचऱ्याचे लेबल लावून त्यामागून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. तपासणी नाक्यावरील एक्साइजच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.दारुसह वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे ३८ लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच ४० सिओ १८०१) असा एकूण ८० लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ट्रक चालक धर्मेंद्र याला ताब्यात घेण्यात आले www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button