
गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोंढे येथील वळण ठरतंय अपघाताचे ठिकाण, बळी जाऊनही बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
_गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोंढे रिगल हॉल येथील वळण आणि पूल वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या परिसरात आतापर्यंत सहा ते सात अपघात झाले आहेत. त्यामध्ये दोन व्यक्तींचा बळीही गेला आहे. या परिसरात मागणी करूनही पुलाच्या रेलिंगचे काम केले जात नसल्यामुळे स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.तालुक्यातील कोंढे येथील पूल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. या परिसरातील मोठ्या वळणावर काही वर्षांपूर्वी एका तरुणाची दुचाकी संरक्षक भिंतीवर आदळून त्याला जीव गमवावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच एक बुलडोजर पुलाचे रेलिंग तोडून नदीत कोसळला होता. या घटनेला जवळपास पाच वर्षे ओलांडली आहेत. पुलाचे रेलिंग नव्याने उभारून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे (रोहयो) उपअभियंता यांच्याकडे केली होती. त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पण त्याला यश आले नाहीwww.konkantoday.com