
हायकोर्टानं अरविंद केजरीवालांच्या अटकेला वैध ठरवलं,अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली
कथित दारु घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टानं धक्का दिला आहे. ईडीकडून केजरीवालांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होते.यावेळी हायकोर्टानं अरविंद केजरीवालांच्या अटकेला वैध ठरवलं आहे. ईडीचे पुरावे पाहून कोर्टानं हा निकाल सुनावत अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.न्या. स्वर्ण कांता शर्मा यांनी निर्णय सुनावताना म्हटलं की, हे प्रकरण केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील नाही तर ईडी आणि केजरीवाल यांच्यात आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली. ईडीकडे असणारे पुरावे पाहता ही अटक वैध आहे. कुणालाही विशेषाधिकार देऊ शकत नाही. तपासातील चौकशीपासून मुख्यमंत्री म्हणून कुठलीही सवलत दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीश कायद्याने बांधलेले आहेत. राजकारणाशी नाही असंही कोर्टाने स्पष्ट केले.www.konkantoday.com