
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायधीशांकरिता सिंधुदुर्गनगरी येथे सात निवासस्थाने बांधण्यात येणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायधीशांकरिता सिंधुदुर्गनगरी येथे सात निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजित ८ कोटी ३३ लाख ७१ हजार ६१० रुपये खर्च केले जाणार आहेत. या बांधकामाचा कोनशिला समारंभ शनिवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीच्या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासाठी निवास्थान उभारण्यात आले होते. मात्र अन्य न्यायाधीशांच्या निवास्थानाचा प्रश्न कायम होता. दरम्यान सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील न्यू इंग्लिश स्कूल ओरोसनजिकचा १८ एकरचा भूखंड न्यायाधीशांच्या निवास्थानांसाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडावर निवास्थाने बांधण्यास महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे. www.konkantoday.com