लोकमान्य टर्मिनस-कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल ११ एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर गुरूवारी धावेल

उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावर धावणार्‍या नियमित रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त कर्दी कमी करण्यासाठी उदाना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलच्या ३६ फेर्‍या जाहीर केलेल्या असतानाच शनिवारी मध्यरेल्वेने एलटीटी-कोच्युवेली साप्ताहिक उन्हाळी स्पेशल जाहीर केली. स्पेशलच्या २४ फेर्‍या २९ जूनपर्यंत धावणार आहेत. ८ एप्रिलपासून आरक्षणही खुले होणार असल्याने चाकरमान्यांसह पर्यटक कमालीचे सुखावले आहेत.०१४६३/०१४६४ क्रमांकाची लोकमान्य टर्मिनस-कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल ११ एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर गुरूवारी धावेल. एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री ८.४५ वाजता कोच्युवेली येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात १३ एप्रिल ते २९ जून दरम्यान दर शनिवारी धावेल. कोच्युवेली येथून सायंकाळी ४.२० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री ९.५० वाजता एलटीटीला पोहचेल.स्पेशलला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुमठा, कुंदापुरा, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, थिरूर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, टाऊन, कोटायम, कोल्लम आदी स्थानकात थांबे आहेत. सोमवारपासून आरक्षणही खुले होणार असल्याने आरक्षित तिकिटासाठी प्रवाशांची तिकिट खिडक्यांवर झुंबड उडणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button