राजापूरच्या गंगेत दहा दिवसात लाखो भाविकांनी केले स्नान
राजापूर गंगातीर्थ क्षेत्रावर भाविकांची होणारी गर्दी पाहता उन्हाळे येथील गंगामाईवर भाविकांची पूर्ण श्रद्धा असल्याचे सिद्ध होत आहे. २४ मार्चला प्रकटलेल्या गंगामाईचे गेल्या दहा दिवसांत लाखो भाविकांनी दर्शन घेत स्नान केले आहे. तर शनिवारी विविध गावातील सात ग्रामदेवतांच्या पालख्यांनी गंगाक्षेत्री भेट दिली. काही वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा भाविकांनी भरलेले गंगामाईचे रूप पहायला मिळत आहे.उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. अशा स्थितीत ऐन उन्हायातच राजापूर शहरानजिकच्या उन्हाळे गावी एका डोंगरावर गंगामाई प्रगट होते. हे एक आश्चर्यच आहे. ऐन शिमगोत्सवात २४ मार्च म्हणजे होळी पौर्णिमेलाच शहरालगतच्या उन्हाळे गावी गंगामाईचे आगमन झाले. गंगा आगमनाची बातमी सर्वदूर पसरल्याने आता भाविक गंगामाईच्या पवित्र पाण्याने स्नान करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. रविवारी गंगामाईच्या पवित्र स्थानी तर गर्दीचा उच्चांक दिसून आला. कोल्हापूर, मिरज, इचलकरंजी, पुणे, गोवा, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांहून असंख्य भाविक गंगास्नानासाठी आल्याचे निदर्शनास आले. तर स्थानिकांसह परजिल्ह्यातील म्हणजे धाराजीव, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणच्या व्यापार्याांनी विविध प्रकारची दुकानी छाटली असून त्यातून गेल्या दहा दिवसांमध्ये सुमारे दहा लाखांहून अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचे समजते. www.konkantoday.com