रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या ऑफिसमधून पार्किंगमधून अज्ञाताने दुचाकी लांबविली
रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या ऑफिसमधून पार्किंगमधून अज्ञाताने दुचाकी लांबविली. ही घटना गुरूवार ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० वा. कालावधीत घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदय शांताराम मोरे (रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरूवारी सकाळी १० वा. सुमारास उदय मोरे यांनी आपली युनिकॉर्न दुचाकी (एमएच ०८ एएस-३८८३) श्रीराम कंपनीच्या ऑफिस पार्किंगमध्ये पार्क केली होती.दुपारी २.३० वा. सुमारास ते ऑफिस पार्किंगमध्ये आपली दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजूला दुचाकीचा शोध घेतला परंतु ती कोठेही आढळली नाही. शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. www.konkantoday.com