
रत्नागिरी शहरात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात साजरी नरेंद्र महाराज संस्थांनचीदेखील आकर्षक मिरवणूक
रत्नागिरी शहरात गुढीपाडव्यानिमित्त म्हणजे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली या स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, नाक्यानाक्यांवर काढलेली आकर्षक रांगोळी, रस्ता दुभाजकांवर उभारलेल्या गुढ्या अशा मंगलमय वातावरण शहरात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात काढण्यात आली. या स्वागतयात्रेचे नियोजन ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर देवस्थान संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था व सर्व हिंदुत्ववादी संस्था, कार्यकर्त्यांनी केले. हिंदू एकतेचे दर्शन घडवत स्वागतयात्रा काढण्यात आली.झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. त्याच वेळी मारुती मंदिर व शहराच्या वरच्या भागातील हिंदू बंधू भगिनींनी एकत्र येऊन स्वागतयात्रेला सुरवात केली. दोन्ही ठिकाणचे मिळून सुमारे ७० चित्ररथ पाहायला मिळाले. सामाजिक संदेश, छत्रपती शिवाजी महाराज देखावा, स्वामी समर्थ, राधा- कृष्ण असे विविध देखावे केले होते.शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याने वातावरण भगवेमय झाले होते दरम्याने नरेंद्र महाराज संस्थान तर्फे मारुती मंदिर पासून राम मंदिर पर्यंत करण्यात आलेल्या स्वागत यात्रेनेदेखील सर्वांचे लक्ष वेधले होतेwww.konkantoday.com