मोबाईल फोनवर बोलण्याच्या नादापाई जीव गमावला, गणपतीपुळे येथील घटना
मोबाईल फोनवर बोलण्याच्या नादात अनेक अपघात होत असतात असाच प्रकार गणपतीपुळे येथे घडला आहे फोनवर बोलण्याच्या नादात गच्चीवरून पडल्याने एकाचा मृत्यू होण्याची घटना घडली आहेमोबाईल फोनवर बोलण्याच्या नादात गणपतीपुळे येथील हॉटेलच्या टेरेसवरुन तोल जाउन पडलेल्या लातूर येथील कामगार तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झालासोलर पॅनलच्या दुरुस्तीसाठी तो लातूरहून गणपतीपुळे येथे आला होता. ही घटना सोमवार 8 एप्रिल रोजी मध्यरात्री 12.30 वा. घडली.पुंडलिक नामदेव भूसे (35, मुळ रा.गणेशवाडी शिरुळ अनंतपाल,लातूर सध्या रा.गणपतीपुळे,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री तो फोनवल बोलत असताना गणपतीपुळे येथील गणेशकृपा डिलक्स हॉटेलच्या टेरेसवर जाउन बसला होता. बोलता-बालता तोल गेल्याने तो अचानकपणे खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली.ही बाब त्याच्या सहकार्यांच्या तसेच हॉटेलमधील कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी पुंडलिकला तपासून मृत घोषित केेलेwww.konkantoday.com