महाविकास आघाडीचा तिढा सुटला!! अंतिम जागावाटप जाहीर, सांगलीची जागा शिवसेनेला


मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीती पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर केला. लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे.

महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या 17 जागा

नंदूरबार
धुळे
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
जालना
मुंबई उत्तर मध्य
उत्तर मुंबई
रामटेक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा

बारामती
शिरुर
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
अहमदनगर दक्षिण

शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा

दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई (North West)
मुंबई ईशान्य
पालघर
कल्याण
मावळ
धाराशीव
हातकणांगले
संभाजीनगर
शिर्डी
सांगली
हिंगोली

संजय राऊतांचा नाना पटोलेंना मिश्किल टोला

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर संजय राऊत यांनी मविआमधील सर्व प्रमुख नेत्यांचा परिचय करुन दिला. संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, आजच्या गुढी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद होत आहेत. अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. आजचं वातावरण प्रसन्न आहे, असं म्हणत असताना राऊतांनी नाना पटोलेंना मिश्किल टोलाही लगावला. नाना पटोले मान हलवताय. काँग्रेस नेत्यांचे आनंदी चेहरे पाहतायत. पवार साहेबांचा प्रसन्न चेहरा बघतोय. शिवालयाच्या या वास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button