बसमधून उतरताना पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू
दापोली :-*दापोली-मंडणगड मार्गांवरील महाळुंगे देवघरेवाडी येथील बस थांब्यावर परळ दापोली बसमधून पाय घसरून पडून एक महिला प्रवासी जखमी झाली. तिचा उपचारावेळी मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी घडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काळाचौकी मुंबई येथील जयश्री जगन्नाथ जाधव (वय ५८) या ६ एप्रिल रोजी रात्री बसने महाळुंगे देवघरे वाडी येथे सासूच्या दशक्रियाविधीसाठी कुटुंबीयांसह येत होत्या. ७ एप्रिल रोजी सकाळी महाळुंगेत बसमधून उतरत असताना त्यांचा पाय घसरला. त्या जोरात रस्त्यावर पडल्या. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.