
बहादूरशेखनाका येथील पुलावरुन जून महिन्यापर्यंत या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू हाेणार
काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेखनाका येथील पुलाचे काम रखडले होते. मात्र या पुलाच्या कामाने वेग घेतला असल्याने येत्या जून महिन्यापर्यंत या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होईल असे सांगितले जात आहे. या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्यास सर्वसामान्य थोडासा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com