जिल्हा रूग्णालयात खुब्याच्या सांधा बदलाची शस्त्रक्रिया डॉ. निखिल देवकर यांनी केली यशस्वी

वैद्यकीय क्षेत्रात वडिलांच्या जागी संधी भेटण्यासाठी अपार मेहनत, अभ्यास, प्रॅक्टीस करावी लागते. अशीच मेहनत करून अस्थिरोग तज्ञ झालेल्या डॉ. निखिल देवकर यांनी अपघातामुळे खुब्याचे हाड मोडल्यामुळे अंथरूणाला खिळलेल्या खेड कळंबणी येथील चंद्रकांत सुतार यांच्या खुब्याचा संपूर्ण सांधा बदली करून त्यांना नवे जीन दिले आहे. प्रचंड खर्चिक शस्त्रक्रिया डॉ. निखिल देवकर यांनी जिल्हा रूग्णालयात मोफत केली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झालेला रूग्ण स्वतःच्या पायांवर चालत आपल्या घरी गेला आहे. यावेळी चंद्रकांत सुतार यांच्या चेहर्‍यावरील आनंद वेगळाच होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button