खाडीच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील गावडे-आंबेरे येथे फिट आल्याने खाडीच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ वा. कालावाधीत घडली आहे.मंजिरी महेश धानबा (३८, रा. धानबावाडी गावडे-आंबेरे, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मंजिरीला फिट येण्याचा त्रास होता. रविवारी सकाळी ती गावडे- आंबेरे येथे शेण जमा करण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी तिला फिट आल्याने ती खाडीच्या पाण्यात पडल्याने बुडून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com