
हातखंबा येथे दुचाकीस्वाराला ठोकरून डंपर चालक पसार
हातखंबा येथे एका डंबर चालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक देत जखमी केले. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक देत अपघात करून पळ काढणार्या डंपर चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना शनिवार ६ एप्रिल रोजी सकाळी ११.१५ वा. हातखंबा पेट्रोलपंपासमोर घडली. निरज गणपत रेवाळे (२५, रा. भोके, रेवाळेवाडी, रत्नागिरी) असे अपघातातील जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ एआर-३०३४ घेवून खेडशीहून आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास त्याच्या मागून येणारा डंपर (एमएच ४६ बीएफ-१०४४) वरी चालकाने हातखंबा येथील पेट्रोल पंपासमोर निरजच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना त्याला पाठीमागून धडक देत अपघात केला. यात निरजच्या डोक्याला दोन्ही पायांना व हातांना दुखापत झाली. www.konkantoday.com