
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान किल्ले तोरणा तोरण उत्सव सोहळा संपन्न
पुणे : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किल्ले तोरणा तोरण उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून शिवभक्तांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. या वर्षी संघटनेचे अकरावे वर्ष होते
या मोहिमेसाठी आणि नियोजन करणारे शिवशंभू भक्त यांनी उपस्थिती दर्शविली. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख प्रतीक दयानंद चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष आशिष भोसले, पुणे जिल्हा विभाग प्रमुख महेश भरगुडे, महाराष्ट्र राज्य संपर्क अक्षय डोळस यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, संवर्धन करणे जतन करणे ही काळाची गरज आहे. यासंदर्भात गडकिल्ले संवर्धनच्या संघटनेच्यामार्फत आव्हान करण्यात आले.




