
युवा महोत्सवात कोलाज स्पर्धेत टीना हिर्लोस्करला रौप्य पदक
रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाच्या 55 व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराने यश संपादन केलंय.. रत्नागिरी उपपरिसराची विद्यार्थिनी टीना हिर्लोस्कर हिने कोलाज स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलंय. मुंबई विद्यापीठाची युवा महोत्सवाची अंतिम फेरी मुंबई येथील विद्यार्थी भवन येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी एकुण 29 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते त्यामध्ये टीना हिने हे यश संपादन केलंय.
विलास राहटे यांनी कोलाज स्पर्धेसाठी टीनाला मार्गदर्शन केलं. सर जे जे कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नितीन केणी यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर,मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ सुनील पाटील, उपपरिसराचे प्रभारी कुलसचीव अभिनंदन बोरगावे, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ निलेश सावे, प्रा आरती दामले, प्रा.सोनाली मेस्त्री. प्रा. संपदा परब यांनी टीनाचं अभिनंदन केलं.