
मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवीचे शिक्षण मिळणार
मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवीचे शिक्षण मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार विद्यापीठाने अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.या शैक्षणिक वर्षापासून माहिती तंत्रज्ञान विभागात एम.एस. इन डेटा एनालॅटिक्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे.मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात यूएएस वाणिज्य दूतावास या ठिकाणी या करारावर सह्या करण्यात आल्याwww.konkantoday.com