महायुतीमध्ये रखडलेले जागावाटप येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महायुतीमध्ये रखडलेले जागावाटप येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. नाशिक, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर या आपल्या जागा राखण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.तर नाशिकवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य तीन जागांवर भाजपने दावा केल्याने हा तिढा लांबला आहे.महायुतीतील कल्याण, धाराशिव, हिंगोली आणि वाशिम, यवतमाळचा पेच गेल्याच आठवड्यात मिटला आहे. मात्र ठाणे, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर या जागांचा तिढा सुटलेला नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून भाजपचा आग्रह कायम आहे. शिवसेनेकडे इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार नसल्याचे सांगत आणि या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आल्याचे सांगत हा दावा करण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्री ही जागा मिळावी म्हणून ठाम आहेत.www.konkantoday.com