खासदार विनायक राऊत आणि कॉन्ट्रॅक्टर डोळस यांनी जलजीवन योजनेच्या माध्यमातून 170 कोटींचा भ्रष्टाचार केला माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप
खासदार विनायक राऊत आणि कॉन्ट्रॅक्टर डोळस यांनी जलजीवन योजनेच्या माध्यमातून 170 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा घणघणाती आरोप भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी केला असून 2024 मला सत्ता आल्यानंतर या दोघांची सखोल चौकशी करणार असल्याचे निलेश राणे यांनी लांजा येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी बोलताना जाहीर केले.लांजा येथे झालेला भाजपाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की येथील खासदार विनायक राऊत त्याने कॉन्ट्रॅक्टर डोळस यांच्या मदतीने 170 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे .तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी आलेल्या पाण्याचा जलजीवन या योजनेसाठी 170 कोटी रुपये आले होते. त्यापैकी कॉन्ट्रॅक्टर डोळस याला हाताशी धरून खासदार राऊत यांनी भ्रष्टाचार केला आहे .गावात पाणी येऊ दे अगर न येवो दे खासदार राऊत याला ् काही देणे घेणे नाही .आणि कॉन्ट्रॅक्टर डोळस हा या लोकसभेच्या इलेक्शनला या जलजीवनच्या योजनेतून केलेल्या भ्रष्टाचाराच्या रकमेतून पैसा पुरवणार असल्याचा घणाघात निलेश राणे यांनी केला. या दोघांची ,खासदार राऊत आणि डोळस याची चौकशी झाली पाहिजे अशी विनंती यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली. तसेच सन 2024 ला भाजपा सरकार आल्यानंतर या दोघांची चौकशी झाली पाहिजे. असे निलेश राणे म्हणाले.www.konkantoday.com