अनिल परब यांनी आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम केले-आमदार योगेश कदम
संजय कदम यांना निवडणुकीत फायनान्सर मिळावा, म्हणून आमच्या घरगुती वादात ठिणगी टाकण्याचे काम ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले आहे, असा आरोप दापोलीचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी केला.आमदार कदम यांनी अनिल परब यांच्या आरोपांचा समाचार घेताना म्हणाले की, मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी केली आहे. वास्तविक संजय कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असताना फायनान्सर मिळावा म्हणून आमच्या कौटुंबिक वादात परब यांनी ठिणगी टाकली आहे. आमच्या काकांचा त्यांनी वापर करून घेतला. रामदास कदम व त्यांचे बंधू सदानंद कदम एकत्र येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करत राहिले. त्या दोघांमध्ये भांडण लावायची आणि स्वतः त्याचा फायदा करून घ्यायचा, ही नीती वापरून अनिल परब यांनी आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे.आमच्या घरातील वाद हा आम्ही आमच्या चार भिंतीमध्ये सोडवू, पण अशा प्रकारे जाहीर पत्रकार परिषदेमधून जर अनिल परब आमच्या कौटुंबिक वादाचा उल्लेख करत असेल. तर ते किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत, हे लक्षात येतेwww.konkantoday.com