१४ एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 5 बंद रत्नागिरी, दि. 7 (जिमाका) : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा. दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून जेलनाका-जीजीपीएस- गीताभवन-जयस्तंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौध्दजन पंचायत समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शासकीय रुग्णालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शासकीय रुग्णालय येथे होणार असून, तेथील रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने सुरु ठेवल्यास अपघात घडून त्याव्दारे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा. दरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल नाका-जीजीपीएस- गीताभवन-जयस्तंभ मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात म्हटले आहे.000