राजापूर तालुक्यातील सौंदळ मुसलमानवाडी येथे दारूच्या नशेत डंपर चालकाची वीजखांबाला धडक
राजापूर तालुक्यातील सौंदळ मुसलमानवाडी येथे दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवून रस्त्यालगतच्या वीजखांबाला धडक देवून नुकसान करणारा वाहन चालक मशाक इब्राहीम शेख (२६, रा. कणकवली) याच्या विरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सौंदळ येथील पोलीस पाटील सौ. समृद्धी पाटील यांनी राजापूर पोलीस स्थानकात फियांद दाखल केली आहे. गुरूवारी दुपारी मशाक इब्राहीम शेख याने दारूच्या नशेत आपल्या ताब्यातील डंपर भरधाव वेगात चालवून सौंदळ मुसलमानवाडी येथील दर्ग्याजवळ असलेल्या वीज खांबाला धडक देवून नुकसान केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्याात आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी मशाक शेख याच्या विरोधात भादंवि कलम २७९, ४२७ मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com