महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव आज

__महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव संगमेश्वर तालुक्यात आज ७ एप्रिलला संगमेश्वरसह कसबा या ठिकाणी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी संगमेश्वर तालुक्यात केली जात नाही. फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून ही रंगपंचमी साजरी केली जाते. यालाच देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव असे म्हणतात. यंदा हा उत्सव आज ७ एप्रिलला होत असून, कसबा- संगमेश्वर येथील मंदिरे सजवण्यात आली आहेत. या उत्सवात लाल रंगाची दिवसभर उधळण करून भाविक देवीला रखवालीचे आणि नवसाचे जे नारळ, कोंबडे आणि बोकड अर्पण करतात त्याचा प्रसाद करून रात्री मटणभाकरीच्या प्रसादाने या उत्सवाची सांगता होते. या उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हा येणाऱ्या भक्तगणांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button